Ad will apear here
Next
आपले सण आणि आयुर्वेद + साधे उपाय सोपे उपाय
काही आजार साध्या, सोप्या उपायांनाही ते आटोक्यात आणता येऊ शकतात, पण हे उपाय म्हणजेच उपचार कोणते, याची माहिती तज्ज्ञाकडून घेणे हितावह असते. वैद्य य. गो. जोशी यांचे हे पुस्तक अशा उपचारांसाठी मार्गदर्शन करते.

सहजसाध्य वनस्पती, स्वयंपाकघरातील घटक आदींचे उपयोग त्यांनी या पुस्तकात सांगितले आहेत. उदा. खोकला झाला, तर कापूर वापरावा किंवा मोहरीचा लेप, बकुळ, कोरफड यांचा उपयोग कशासाठी आणि कसा करता येतो आदी माहिती ते देतात. जोशी यांचेच आपले सण आणि आयुर्वेद हे छोटेखानी पुस्तक ‘ऋतू, सण आणि आयुर्वेद’ यांची सांगड घालते. सहा ऋतूंचा परिणाम आपल्या आरोग्यावर कसा होतो आणि निरोगी राहाण्यासाठी ऋतुचर्या कशी असावी, याची माहिती ते देतात. पुस्तकात त्यांनी ऋतूनुसार प्रकरणे केली आहेत.

प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन
पाने : २०६
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZULBR
Similar Posts
काय खाऊ, किती खाऊ? काय खावे हा प्रश्न अनेकांना पडतो. पोषणमूल्य असलेले पदार्थ खाणे नेहमीच हितकारक ठरते. आजारपणातही आहाराला महत्त्व असते. शिवाय आजाराच्या स्वरूपानुसार आहारही बदलत असतो. कोणत्या वेळी कोणता आहार घ्यावा यावर डॉ. वैशाली मंदार जोशी यांनी ‘काय खाऊ, किती खाऊ?’मधून मार्गदर्शन केले आहे.
हृषीकेश मुखर्जी आनंद, गुड्डी, चुपके चुपके, अभिमान असे चित्रपट आठवले की हृषीकेश मुखर्जी यांचे नाव येते. हृषीदांचे चित्रपट व त्याचे रसग्रहण असे स्वरूप असलेले ‘हृषीकेश मुखर्जी’ हे पुस्तक जय अर्जुन सिंग यांनी लिहिले आहे.
औषधभान ‘ग्राहकांमध्ये औषधांबाबतची जागरुकता, डोळसपणा व योग्य माहिती असणे आवश्यक आहे. औषध तेच, पण योग्य मात्रेत जबाबदारीने वापरले, तर अमृत, नाहीतर होते एक विष’, असे प्रा. मंजिरी घरात यांनी म्हटले आहे. जबाबदारीने वापरणे म्हणजे औषधसाक्षरता. या पुस्तकात त्यांनी वाचकांना औषधसाक्षर केले आहे.
मेनोपॉज मेनोपॉजचा काळ हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील अत्यंत नाजूक काळ असतो. या काळात स्त्रीच्या शरीरामध्ये जसे बदल होत असतात, तसेच तिच्या भावविश्वात. या काळाला सहजतेने सामोरे जाण्यासाठी काय करावे, याचे शास्त्रीय मार्गदर्शन स्त्रीरोगतज्ञ डॉ. आनंद शिंदे यांनी या पुस्तकातून केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language